काहि दिवसां पुर्वि एका मराठि मुवि च trailer पाहिल चांगल वाटलं. बाकिचे trailer जसे असतात तसच.पण त्या मुवि च नाव वाचुन मनामधे विचारांच आणि अठवणि च काहुर माजल "ति सध्या काय करते" .या प्रश्नातच अर्ध्या अनेक जनांच बालपण आणि थाेडफार तरुण पण गेलेलं आणि ऊरलेल्या अयुष्यात स़्वतःला स़्वतानिच विचारलेला प्रश्ण म्हणजे "ति सध्या काय करते?",बर्याच दिवसा पासुन मना च्या एका कोपर्यात शांत पणे अपल्यातच गुंग झालेला हा प्रश्ण अगदि मोठ वादळ घेऊन आला. हा प्रश्न म्हणजे तिचा अजान्तेपणि समोर अलेला चेहरा आणि मि घेतलेला मोठा श्वास.बसल्या बसल्याच भिंतिला डोळे बंद करुन डोकं टेकल,आणि काहि ‌क्षणा च्या अवधि मधे तिचि झालेलि पहिलि भेट आणि तिने केलेला शेवटचा बाय यामधिल प्रवास मना मधे प्रकाशाच्या दुप्पट वेगाने झाला,तुझ so called ते प्रेम ते पोरवयातलं रे असच काहितरि म्हणतो माझा मित्र मला,हो पोरवयातलं प्रेम,हो नक्किच पाच सहा वर्षाच्या मुलाला झालेल प्रेम. ईतक्या लहान वयात कधि प्रेम होत का?, माहित नाहि पण त्या लहान वयात मला भेटलेलि ति. ज्या मुलिचि आठवण आजहि काळजाचा ठोका चुकवते ति,आई सोबत तर नाळेने जन्मतःच जोडलेल रक्ताच नातं हे रक्ताच नात सोडुन ईतक्या लहान वयात दुसर कोणत नात मि अनुभवलेलं असेल तर ते तिच आणि माझ नात, नात्यांच्या बाजारात अगदि फुकट भेटलेल नात म्हजणजे ते(नंतर च्या काळात ज्याचि किम्मत अश्रुनि भरावि लागलि ते हे नात).
ति जसि simple होति ना तसिच अगदि अमचि झालेलि भेट 'simple' पण आजहि स्मरणात असलेलि.cricket खेळता खेळता तिच्या घरात गेलेला चेंडु जो तिने तिच्या हाताने मला वापस दिलेला, तो चेंडु तर मि परत अणला होता पण त्या चेंडु च्या बदल्यात तिच्या डोळ्यांनि माझ ह्रदय मला तिच्या कडे गहाण ठेवायला भाग पाडल होत. हे ह्रदय एक अशि गोष्ट जि अजुनहि मि तिच्या पासुन सोडवु शकलो नाहि,कदाचित तिच्या हि मनात कधि तरि विचार येऊन जात आसावा "तो सध्या काय करतोय?"

Comments

Popular posts from this blog

janta hu